यावेळी स्मिता वाघ यांनी विमानतळावर शरद पवार यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्मित वाघ यानी म्हटलं की, त्यांच्या आशीर्वादाचा मला फायदा होतो की नाही हे कळेलच. विरोधात असले तरी ज्येष्ठ राजकीय नेते आहेत, वडिलांसमान आहेत. त्यामुळे मी त्यांचा आज आशीर्वाद घेतला. दरम्यान दुसरीकडे स्मिता वाघ यांच्यासोबतच भाजपचे आमदार सुरेश भोळे हे देखील विमानतळावर आलेले आहेत, त्यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली.
advertisement
आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची बुलढाण्यात सभा होणार आहे, त्यासाठी त्यांचं जळगावात आगमन होणार आहे, त्यानंतर ते हेलीकॉप्टरनं बुलढाण्याला रवाना होणार आहेत, तर दुसरीकडे शरद पवार देखील जळगाव दौऱ्यावर आहेत. दोन्ही दिग्गज नेते एकाचवेळी जळगाव दौऱ्यावर असल्यानं जिल्हाचं राजकारण चांगलंच तापलं आहे.
