जळगावातील केमिकल कंपनीच्या भीषण आगीत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती आली समोर आहे. समाधान पाटील असे मयत कामगाराचे नाव आहे. आगीत जळालेल्या एका कामगाराचा मृतदेह आढळून आल्याची प्रशासनाने माहिती दिली. कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याने केमिकल कंपनीला भीषण आग लागली. आग लागली त्यावेळी कंपनीत एकूण 25 कर्मचारी होते. एकूण कामगारांपैकी 23 कामगार हे जखमी झाल्याने त्यांच्यावर सुरू आहेत. जखमी कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीच्या घटनेत दोन कामगार बेपत्ता असून एकाचा मृतदेह सापडला तर अद्यापही एकाचा शोध सुरू आहे.
advertisement
वाचा - महाराष्ट्रात इथं उष्णतेची लाट तर कुठे कोसळणार पाऊस, हवामान विभागाकडून स्पेशल अलर्ट
जखमी 23 जणांपैकी 5 कामगार 70 ते 90 टक्के भजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जिल्हाभरातील सर्व नगरपालिकांच्या अग्निशमन बंबाच्या मार्फत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव अग्निशमन दलाचे पथक घटनस्थळी दाखल झालेय. तीस ते चाळीस अग्नीशमन दलाची वाहाने घटनास्थळी दाखल झाली आहेत. मात्र अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. केमिकलचा स्फोट होत असल्याने आग आणखी वाढतच चालली आहे. आगीचे लोट हवेत दूरवर पसरलेत. आग अटोक्यात येत नसल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
