घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरात एका तरुणाला बेदम मारहाण करत पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. या टोळक्याकडून तरुच्या डोक्यात फरशीनं हल्ला करण्यात येणार होता. मात्र त्याचदरम्यान पोलीस उपाधीक्षकांनी धावत्या वाहनातून उडी घेत या पीडित तरुणाचे प्राण वाचवले आहेत.
पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे हे कार्यालयातून घराकडे जात असताना जामनेर रोडवर होत असलेली हाणामारी पाहून त्यांनी थेट आरोपींवर धावत्या वाहनातून उडी घेत त्यांच्या हातातील फरशी हिसकावून घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यानंतर त्यांनी याबाबत बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित तरुणाचा जाब घेऊन प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
advertisement
