TRENDING:

राखी बांधायचं राहून गेलं! रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला 4 सख्ख्या बहीण-भावंडांचा बुडून मृत्यू, जळगाव हळहळलं

Last Updated:

धरणाच्या पाण्याजवळ गेले असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले. चारही सख्खे बहीणभाऊ क्षणार्धात एकमेकांसोबत बुडाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाच्या परिसरातील केटी वेअर धरण परिसरात खेळायला गेलेल्या चार सख्ख्या बहीण- भाऊंचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

advertisement

चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात आदिवासी समाजाचे आर्य परिवार मजुरीसाठी म्हणून येथील उदय सुधाकर अहिरे यांच्याकडे आलेले आहे. त्यांच्या परिवारात ५ मुली, १ मुलगा आहेत. परिवारातील मोठी मुलगी ही भांडी घासण्यासाठी के. टी. वेअर धरणाच्या काठावर गेली होती.बहिणी सोबत जावे म्हणून रोशनी सुभाषसिंग आर्य (वय ९ वर्ष), शिवांजली सुभाषसिंग आर्य (वय ८ वर्ष), आर्यन सुभाषसिंग आर्य (वय ३ वर्ष) आराध्या सुभाषसिंग आर्य (वय ४ वर्ष, सर्व रा. दुगणी तहसील ता. सेंधवा जिल्हा बडवणी) ही चार मुले रविवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास सोबत गेली.

advertisement

धरणाच्या पाण्याजवळ गेले असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले. चारही सख्खे बहीणभाऊ क्षणार्धात एकमेकांसोबत बुडाले. ग्रामस्थांना समजताच त्यांनी धावाधाव केली. काहींनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविले. पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पावरा परिवाराचा मन हेलावणारा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे पावरा कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे. घटनेबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशिरा नोंद करण्याचे काम सुरु होते.

advertisement

सोलापूरमध्ये अपघातात बहीण-भाऊ जागीच ठार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंबाचे दरही तेजीत, आल्याची काय स्थिती?
सर्व पहा

रक्षाबंधन सणासाठी आलेल्या बहिणीला कारमधून गावाकडे घेऊन जात असताना कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पो यांच्यात हा अपघात झाला. रविवारी सायंकाळी साडे चार वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, जागेवरच कारमधील बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने उपस्थितांनाही गहिवरुन आले.  स्विफ्टचा चक्काचूर झाला असून स्विफ्ट कारमधील बहीण भाऊ जागीच ठार झाले आहेत. मंगळवेढा येथील रोहित तात्यासो जाधव (वय 25 वर्षे), ऋतुजा तात्यासो जाधव (वय 19 वर्षे) अशी मयत बहीण भावाची नावे आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
राखी बांधायचं राहून गेलं! रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला 4 सख्ख्या बहीण-भावंडांचा बुडून मृत्यू, जळगाव हळहळलं
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल