यातच आता रावेर लोकसभेच्या जागेबाबत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रावेर लोकसभेतून मंत्री गिरीश महाजन हे जर लोकसभेसाठी उभे राहिले तर शंभर टक्के निवडून येतील, रावेर लोकसभेचे उमेदवार गिरीश महाजन असावेत अशी आमची इच्छा असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं असून, आता गिरीश महाजन काय भूमिका घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
दरम्यान राज्यात सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन बड्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. तर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट हे महाविकास आघाडीमध्ये आहेत. त्यामुळे लोकसभेच्या कोणत्या जागेवर कोण उमेदवार असणार हे चित्र अद्याप स्पष्ट नसतानाही महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांकडून विविध मतदारसंघावर दावा सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.
