नेमकं काय म्हणाले पटोले?
सरकारनं हा तुघलकी निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे संपूर्ण देशातलं जनजीवन विस्तळीत झालं आहे, जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, वाहन चालकांसाठी केलेला हा कायदा काळा कायदा असून त्यामुळेच या कायद्या विरोधात सर्व चालक रस्त्यावर उतरले आहेत. जन जीवन विस्कळीत ठेवण्याचं काम तानाशाही प्रवृत्ती म्हणजेच या केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
advertisement
राऊतांची प्रतिक्रिया
दरम्यान या कायद्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते सजंय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त पेट्रोल-डिझेल संपाचाच गोंधळ नाही तर मालवाहतूक ठप्प झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांवर हल्ले झाले आहेत. या संदर्भात राज्य सरकारने तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे. याबाबत केंद्रातील नेत्यांशी चर्चा करणं आवश्यक आहे. प्रकरण चिघळत गेलं तर त्याचा सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
