घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना पाचोरा येथील जुन्या धरणगाव रस्त्यालगत घडली आहे. गटारीच्या बांधकामाची उघडी असलेली लोखंडी सळी छातीत घुसून विशाल याचा मृत्यू झाला आहे. तो बांधकाम सुरू असलेल्या गटारी जवळ खेळत होता. खेळताना तो खाली पडला. यावेळी तिथे असलेली लोखंडी सळी त्याच्या छातीत घुसली. या घटनेत विशालचा जागीच मृत्यू झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
दरम्यान या प्रकरणात स्थानिक नागरिकांकडून ठेकेदारावर आरोप करण्यात आला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणात एरंडोल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Nov 14, 2023 8:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon News : खेळताना लोखंडी सळी छातीत घुसून चिमुकल्याचा मृत्यू, दिवाळीत कुुटुंबावर दु:खाचा डोंगर
