वैमानिकाचा विमान उडवण्यास नकार
या नकाराचे कारण स्पष्ट होते. वैमानिक सलग १२ तासांपासून विमान उडवण्याचे काम करत होता. त्याच्या प्रकृतीला आणि तांत्रिक नियमांनुसार अधिक काम करणे शक्य नव्हते. यामुळेच, वैमानिकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान उडवण्यास नकार दिला.
गिरीश महाजन अन् गुलाबराव पाटलांची मध्यस्थी
या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी वैमानिकाशी चर्चा केली. त्यांनी वैमानिकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर, या चर्चेनंतर वैमानिकाने विमान उडवण्यास होकार दर्शवला. या विलंबामुळे एकनाथ शिंदे यांना मुंबईला जाण्यास तब्बल पाऊण ते एक तास उशीर झाला. पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाले.
advertisement
गिरीश महाजन म्हणाले...
वैमानिकांच्या प्रकृतीसह त्याच्या वेळेचा किरकोळ विषय होता. त्याच्या कंपनीशी बोलणं करून एकनाथ शिंदे यांचे विमान रवाना झालं. पायलटच्या तब्येतीची अडचण होती. त्यातही वेळेची अडचण होती. टेक्निकल अडचण होत्या. त्यांच्या कंपनीशी आम्ही बोललो. त्यावेळी त्यांनी पायलटला त्यांच्या भाषेत समजावलं. किरकोळ अडचण होती, विमानात उडालेलं आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.
