नेमकं काय म्हणाले खडसे?
'रक्षाताई आज तिसऱ्यांदा लोकसभेसाठी आपला उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी निघाल्या आहेत. त्यांनी गेले दहा वर्ष पार्लमेंटमध्ये आणि मतदारसंघामध्ये अत्यंत चांगलं काम केलं. विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडले. भारतीय जनता पार्टीतील नेत्यांच्या आशीर्वादामुळे, केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वामुळे त्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालं आहे.
एवढ्या लहान वयामध्ये 36 व्या वर्षी त्या तिसऱ्यांदा खासदार होण्याच्या तयारीमध्ये आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. सर्वांच्या सहकार्यामुळे रक्षा खडसे या अधिक चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील असा मला विश्वास आहे. माझा अजून भाजपमध्ये प्रवेश झाला नाही. परंतु रक्षा खडसे या माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्या माझ्या सून नाही तर मुलगी आहे. भारती जनता पर्टीमध्ये होऊ घातलेल्या माझ्या प्रवेशाच्या आधारावर मी त्यांना सहकार्य करणार आहे. माझ्या सहकार्यामुळे त्यांना निश्चित प्रमाणात चांगलं मताधिक्य मिळेल. त्यांचा उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी मी उपस्थित राहणार नाही, कारण मी अजून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
advertisement
