बनावट कागदपत्रांचा वापर करून मोठा गुन्हा
फसवणूक करणारा हितेश संघवी स्वतःला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे भासवत होता. त्याने लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी शिंदे यांच्या नावाचे बनावट ओळखपत्र, लेटर पॅड आणि अपॉइंटमेंट लेटरचा सर्रास वापर केला. नोव्हेंबर 2024 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत त्याने अनेक गरजू नागरिकांना सरकारी नोकरी आणि कमी दरात घरांचे स्वप्न दाखवले. फसवणुकीचे व्यवहार हर्षल शालिग्राम बारी यांच्या कालिंका माता मंदिर परिसरातील दूध डेअरीमध्ये झाले. हर्षल बारी यांच्याकडून एकट्याकडून 13 लाख 37 हजार रुपये तर इतर पीडितांकडून 42 लाख 22 हजार रुपये उकळण्यात आले.
advertisement
फसवणूक उघडकीस आणि पोलीस कारवाई
दीर्घकाळ वाट पाहूनही जेव्हा ना आश्वासित नोकऱ्या मिळाल्या ना कोणती कामे झाली, तेव्हा पीडितांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर, हर्षल बारी यांनी धाडस करून जळगावच्या शनिपेठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, शनिपेठ पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हर्षल बारी यांनी शनिपेठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार जळगावच्या शनिपेठ पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तातडीने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.