अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा पाडळसे यासह वेगवेगळ्या संस्थांच्या सहा ते सात शाळांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार तसेच अफरातफर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर अंमळनेर तालुक्यातील टाकरखेडा गावात अनुदानित शाळा कागदावर दिसून येत आहे. त्याची अनुदानही संस्थाचालक गेल्या काही वर्षांपासून लाटत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मात्र या गावात अशी कुठली शाळा नसल्यामुळे गावातील शाळा चोरीला गेली की काय असाच प्रश्न उपस्थित होत आहे..?
advertisement
कुठलीही मान्यता नसताना शाळेच्या तुकड्या वाढवणे शिक्षकांची बेकायदेशीर भरती करणे तसेच विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवून शासनाचा अनुदान लाटणे,संस्थाचालकांच्या खोट्या संह्याचा वापर करून अशा पद्धतीने कोट्यावधी रुपयांचा अपहार होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली आहे.मात्र चार महिन्यांपासून तक्रारींचा पाठपुरावा सुरू असून कुठलीही कारवाई झालेली नाही त्यामुळे निवृत्त न्यायाधीश यांच्यामार्फत संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे तसेच दोशींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संस्था चालवण्याच्या नावाखाली शरद देवराम शिंदे नामक व्यक्तीकडून शिक्षक तसेच संस्थाचालक यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून फसवणूक केली जात असल्याचेही प्रकरण समोर आले. स्वतः शिक्षक तसेच संस्थाचालकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. संबंधित गैर व्यवहारात जळगावच्या शिक्षणाधिकारी पासून ते मंत्रालयापर्यंत सर्व साखळी आहे. त्यामुळे अर्थपूर्ण व्यवहारातून कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
