घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव - छत्रपती संभाजीनगर मार्गावरील कन्नड घाटात मध्यरात्रीच्या सुमारास कार व अन्य वाहनांचा भीषण अपघात झाला झाला, या अपघातात चार प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती आहे. तर सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकाश गुलाबराव शिर्के, शिलाबाई प्रकाश शिर्के, वैशाली धर्मेंद्र सूर्यवंशी व पूर्वा गणेश देशमुख असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत.
advertisement
मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसामुळे कन्नड घाटात दरड देखील कोसळली होती. त्यामुळे वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. धुक्यामुळे रस्ता दिसत नव्हता. त्यातच हा अपघात झाला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
कोल्हापुरात बसचा अपघात
दरम्यान दुसरीकडे कोल्हापुरातही अशीच एक घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली एसटी बस पलटी झाली. सिए फाटा परिसरात हा अपघात झाला आहे. पहाटे साडेचारच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बस ठाण्याहून चंदगडला जात होती.
