TRENDING:

गोळीबारात भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू; पोलिसांकडून गुन्ह्यातील कार, शस्त्रे जप्त

Last Updated:

अज्ञात हल्लेखोरांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पांढऱ्या कारमध्ये येऊन महेंद्र मोरे यांच्यावर हल्ला कोला होता, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव, शरद जाधव, प्रतिनिधी : गुरुवारी भाजपचे माजी नगरसेवक महिंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता. आज उपचारादरम्यान पहाटे त्यांचं निधन झालं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महिंद्र मोरे यांच्यावर चाळीसगावमध्ये सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या त्यांच्या कार्यालयामध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.
News18
News18
advertisement

अज्ञात हल्लेखोरांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पांढऱ्या कारमध्ये येऊन त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनं चाळीसगावसह परिसरात एकच खळबळ उडाली होती. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तपासचक्र फिरवत कन्नड तालुक्यातील सायगाव येथून गुन्ह्यात वापरलेली कार, जिवंत काडतूसे आणि कोयते जप्त केले आहेत. मात्र अद्यापही हल्लेखोरांचा शोध लागलेला नाहीये.

तालुक्यातील सर्व लॉजची पोलिसांनी झाडाझडती घेतली मात्र हल्लेखोर कुठेच मिळून आले नाहीत. त्यामुळे आता हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी पथकांची नियुक्ती केली आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. बाळू मोरे यांची हत्या पूर्व वैमानस्यातून झाली असावी असा संशय आहे, त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

advertisement

दरम्यान चाळीसगावमधील स्टेशनरोड भागात बाळू मोरे यांचं वास्तव्य होतं. आनंदवाडी, सिंधी कॉलनी परिसरातून ते अपक्ष तसंच भाजपच्या तिकिटावरही नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. त्यांच्यावर गोळीबार का झाला ? हे अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणात जे सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं आहे, त्याच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

advertisement

दोन माजी नगरसेवकांचा मृत्यू  

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंबाचे दरही तेजीत, आल्याची काय स्थिती?
सर्व पहा

राजकीय पदाधिकाऱ्यांवर मागील आठवडाभरात गोळीबाराच्या 3 घटना घडल्या आहेत. उल्हासनगर, चाळीसगाव आणि दहीसरमध्ये या घटना घडल्या. या तीन घटनेत दोन माजी नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. दहीसर गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला, तर आज महेंद्र मोरे यांचा देखील मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
गोळीबारात भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू; पोलिसांकडून गुन्ह्यातील कार, शस्त्रे जप्त
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल