जळगाव जिल्ह्यात रविवारी 173 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान झालं. आज मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपनं चाळीस ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे शिवसेनेनं देखील जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 38 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेनं विजय मिळवला आहे. तर दहा ग्रामपंचायतींमध्ये अजित पवार गटाची सत्ता आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाला अवघ्या सहा ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला सात तर काँग्रेसची दोन ग्रामपंचायतींमध्ये सत्ता आली आहे. तर 11 ठिकाणी स्थानिक आघाड्यांचा विजय झाला आहे.
advertisement
पंकजा मुंडेंना धक्का
परळी विधानसभा मतदारसंघातील सहा ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झालं होतं. या ग्रामपचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. सहा पैकी पाच ग्रामपंचायतींमध्ये धनंजय मुंडे गटानं विजय मिळवला आहे. तर अवघ्या एक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय झाला आहे.
दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल म्हणून निवडणूक लढवली जाते, त्यामुळे कोणाताही गट हा पक्षाच्या तिकीटावर प्रत्यक्ष निवडणूक लढवत नाही. या पॅनलला राजकीय पक्षांचं समर्थन असतं.
