पावसानं दडी मारली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस न पडल्यानं पिके संकटात आली आहे. यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोषक वातावरण निर्माण झाल्यास कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय शासनासी चर्चा करून घेता येईल. जिल्ह्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टँकरही सुरू करण्यात आले आहेत. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता विहिरी अधिग्रहन करण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो असं पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
देवकरांना टोला
दरम्यान गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. आधी हेच राष्ट्रवादीवाले आमच्यावर 50 खोके एकदम ओके म्हणून टीका करत होते, आणि आता अजितदादा आमच्याकडे आले तर यांची बोलती बंद झाली असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, काही दिवसांपूर्वीच यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत गेलेल्या अनिल भाईदास पाटील यांचा सत्कार केला होता, आणि आता हे सांगतात की आम्ही शरद पवर यांच्या गटात आहोत. शरद पवारांच्या की अजित पवारांच्या आदेशाचं पालन करतात हे आधी सिध्द करा, असं आव्हानही यावेळी गुलाराव पाटील यांनी नाव न घेता देवकर यांना केलं आहे. अनिल दादांचा सत्कार करणारे पण तुम्हीच. शरद पवार जिंदाबाद म्हणणारे पण तुम्हीच आणि विरोध करणारे पण तुम्हीच. हे लोक स्टेबेल नाहीयेत असं पाटील यांनी यांनी म्हटलं आहे.
