जळगाव जिल्ह्यात कडक उन्हाळा असतो, उन्हाळ्यात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचते. मात्र अशा उष्णतेमध्ये देखील या मूर्तीवरील लोणी वितळत नाही. मूर्तीच्या या खास वैशिष्ट्यामुळे तापी नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर जगप्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा हनुमान अशी या मंदिराची ओळख आहे. हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या संख्येनं दर्शन घेण्यासाठी भाविक या मंदिरात गर्दी करतात.
advertisement
गावातील एका व्यक्तीकडे त्यांचे नातेवाईक मुक्कामाला थांबले. या नातेवाईकाकडे एक म्हैस होती. ती दूध देत नव्हती. तेव्हा या नातेवाईकाने हनुमानाला नवस बोलला. माझी म्हैस जर दूध देऊ लागली तर मी तिच्या दुधापासून बनवलेल्या लोण्याचा नवैद्य तुला दाखवेल असं साकड त्यांनी घातलं. त्यानंतर हनुमानाचा चमत्कार म्हणा किंवा आणखी काही म्हशीने दुसऱ्याच दिवशी दूध दिले.
त्यानंतर संबंधित व्यक्ती दुसऱ्याच दिवशी नवस फेडण्यासाठी लोण्याचा गोळ्या घेऊन हनुमानाच्या मंदिराकडे येण्यासाठी निघाले. मात्र येताना त्यांना वाटेत अंधार झाल्याने सकाळी नवस फेडण्याच्या विचाराने लोण्याचे भांडे छताला टांगून त्यादिवशी त्या व्यक्तीनं आपल्या नातेवाईकाकडेच मुक्काम केला. त्याच रात्री ज्यांच्याकडे ते मुक्कामी थांबले होते त्यांच्या घराला अचानक आग लागली. आगीत सगळे काही जळून खाक झाले. पण लोण्याचे छताला टांगलेले मडके जशेच्या तसे राहिले. त्यानंतर ते लोणी हनुमानाला नवस फेडण्यासाठी अर्पण करण्यात आले. तेव्हापासून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला अवचित हनुमानाच्या मूर्तीस लोणी चढविण्याची प्रथा सुरू झाली. ती आजतागायत सुरू आहे, अशी या प्रथेमागची अख्यायिका आहे.
लोण्यापासून साकारलेल्या मारूतीच्या मूर्तीवर दरवर्षी लोणी लावले जाते. मूर्ती लोण्याची असली तर त्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवून येत नाही. विशेष म्हणजे उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यातील तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. या तिव्र उन्हाच्या झळांमध्ये देखील मूर्तीवरील लोणी वितळत नाही.
