याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या देऊळगाव गुजरी येथे माहेरी आलेल्या पत्नी व नऊ महिन्याच्या मुलीची पतीने हत्या केलीय. पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर पतीनेही बुलढाणा जिल्ह्यातील दुधगाव येथे आपल्या घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल झनके व प्रतिभा झनके या पती-पत्नीत कौटुंबिक वाद होते. यामुळे प्रतिभा झनके आपल्या 9 महिन्याच्या मुलीसह तीन महिन्यापासून देऊळगाव गुजरी येथे माहेरी राहत होत्या.
advertisement
विशाल झनके याने देऊळगाव गुजरी येथे येऊन पत्नी व मुलीची हत्या केली. पत्नी आणि मुलीच्या हत्येनंतर विशाल बुलढाणा जिल्ह्यातील दुधलगाव येथे आपल्या घरी आला. तिथे त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 13, 2024 8:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon : पत्नी अन् 9 महिन्यांच्या चिमुकलीची केली हत्या, पतीने स्वत:लाही संपवलं; जळगाव हादरलं
