भाजीपाल्यांचे दर वाढतच होते. मात्र गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत आता भाजीपाला महागला आहे. या पंधरवड्यात भाजीपाल्याचे दर सरासरी २० ते ३५ रुपये किलोने वाढले आहेत. भुसावळमध्ये नाशिक, छत्रपती संभाजीनगर, विदर्भातून भाजीपाला येतो. यापैकी काही भागात मध्यंतरी पूर्वमोसमी पाऊस झाला. विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन कमी होऊन दरवाढ झाली. सध्या केवळ जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड परिसरातील भाजीपाला भुसावळमध्ये विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले आहेत.
advertisement
कांद्याच्या दरामध्येही वाढ
दरम्यान दुसरीकडे कांद्याच्या दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत जवळपास कांद्याचे दर दुपटीनं वाढले आहेत. कांद्यासह सगळ्याच भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडल्याचं चित्र आहे.
