याबाबत मिळालेली माहिती अशी की, जामनेरहून बोदवडकडे सुनील वही आणि दत्तू माळी निघाले होते. त्यांच्या मागे इश्वर पारधी हेसुद्धा दुचाकीवर होते. दरम्यान, मालदाभाडी इथं दोन्ही दुचाकींना चारचाकी गाडीची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघांचाही मृत्यू झाला. इश्वर त्र्यंबक पारधी हे जिल्हा परिषद शाळेत मुख्यध्यापक होते.
अपघातावेळी मागून येणाऱ्या पिकअप चालकाचेही त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. सुदैवाने त्याला यामध्ये किरकोळ दुखापत झाली. पिकअप चालकाने दिलेल्या माहितीनुसार, कारने दुचाकींना ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2023 9:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon : कारने दोन दुचाकींना उडवले, मुख्याध्यापकासह तिघांचा जागीच मृत्यू
