काय आहे प्रकरण?
गावबंदी असताना देखील कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता महिलेसह 13 वर्षीय मुलीला त्रास देणाऱ्या आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी पारोळा येथील रहिवाशी असलेल्या जयश्री शंकर ठाकूर या महिलेने अमळनेर गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत गावगुंडापासून आम्हाला संरक्षण मिळून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. या गाव गुंडांचा त्रास इतका आहे की, 13 वर्षीय मुलीला चक्क गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तक्रारीची दखल घेत जळगावचे पोलीस अधीक्षकांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच लवकरात लवकर या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्याची देखील सांगितले आहे.
advertisement
वाचा - 'लाडकी बहीण'च्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रवी राणांची सारवासारव, आता म्हणाले...
अजित पवारांची जनसन्मान यात्रा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे. नाशिकच्या दिंडोरी येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे. या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हानिहाय दौरा करत महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. अजित पवारांची जनसन्मान यात्रा जळगाव जिल्ह्यात आली आहे. दरम्यान, अजित पवार यांची सुरक्षा वाढवण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला मिळाल्या आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांची अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.
