रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना जळगाव शहरातील न्यू स्टेट बँग कॉलनी परिसरात एका भाड्याच्या घरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. या पथकाने एक बनावट (डमी) ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली.
advertisement
डमी ग्राहकाने घरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्री केल्यावर पोलिसांना मिस कॉल देऊन इशारा केला. त्यानंतर, पोलिसांनी तत्काळ त्या दोन मजली घरावर छापा टाकला. या छाप्यात घरमालक दिनेश संजय चौधरी आणि त्याची पत्नी भारती चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासह आणखी तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी दाम्पत्याने पश्चिम बंगालमधील एका तरुणीला जास्त पैशांचे आमिष दाखवून तिला जळगावला आणलं होतं. इथं तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात होता. याप्रकरणी सर्व आरोपींविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील पुढील तपास सुरू आहे.