घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील लेवा भवनमध्ये जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढीची 71 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. नोकर भरती, वकील फीवरुन सभेला उपस्थित सभासदांनी अध्यक्षांसह सत्ताधार्यांना चांगलेच धारेवर धरल्याने सभेमध्ये गोंधळ उडाला.
सभेमध्ये गोंधळ सुरू असतानाच एक व्यक्ती थेट सभेत शिरला. सभेमध्ये विषय मंजूर झाल्याचे व्यासपीठावरून सांगण्यात आल्यानंतर तो समोर येवून नामंजूर नामंजूर म्हणून ओरडत होता. या गोंधळातच सभेत शिरलेल्या त्या व्यक्तीला सभेला उपस्थित शिक्षकांकडून मारहाण करून बाहेर काढण्यात आलं. यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला. दोन तास चाललेल्या सभेत अजेंड्यावरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
advertisement
मारहाण झालेली व्यक्ती शिक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र त्याला पतपेढीच्या अध्यक्षांनी दुजोरा दिलेला नाही. संबंधित व्यक्ती शिक्षकही नाही व तो पतपेढीचा सभासदही नाही असं असताना तो सभेत शिरला व बेशिस्तपणा करत असल्याने त्याला बाहेर काढलं अशी माहिती पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरूड यांनी बोलताना दिली आहे.
दरम्यान या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं असून घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. संबंधित व्यक्तीला सभेत आणलं कोणी? अशा गावगुंडांना सभेत कोण आणतं , असे गावगुंड तर सभेत आणत असाल तर सभेला गालबोट लागल्याशिवाय राहणार नाही, संबंधित व्यक्तीची तसेच प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधक गटातील संचालक तुळशीराम सोनवणे यांनी केली आहे.
