TRENDING:

चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला, 2 दिवसांपूर्वी गिरीश महाजनांची भेट अन्... रात्री 12 वाजता सांडला रक्ताचा सडा!

Last Updated:

Jalgoan Attack On BJP Former corporator : प्राथमिक माहितीनुसार, तीन हल्लेखोर स्विफ्ट कारमधून आले होते. हा हल्ला जुन्या वादामुळे झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Jalgoan Crime News (विजय वाघमारे, प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. प्रभाकर चौधरी हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जात होते. वैष्णवी साडी सेंटरजवळ रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांनी त्यांची दुचाकी अडवून थेट त्यांच्यावर वार केल्याची माहिती समोर आली आहे.
Jalgoan Crime Former BJP corporator attacked
Jalgoan Crime Former BJP corporator attacked
advertisement

मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव

या हल्ल्यात प्रभाकर चौधरी यांना गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीवर डॉक्टर सध्या लक्ष ठेऊन आहेत. पण नेमकं काय काय झालं? त्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

advertisement

हल्लेखोर स्विफ्ट कारमधून आले अन्...

प्राथमिक माहितीनुसार, तीन हल्लेखोर स्विफ्ट कारमधून आले होते. हा हल्ला जुन्या वादामुळे झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये पथके रवाना केली आहेत.

advertisement

गिरीश महाजन यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन

विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. हल्लेखोर नेमके कोण होते? हल्ला कोणत्या कारणामुळे केला गेला? याची उत्तरं मिळणं अपेक्षित आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला, 2 दिवसांपूर्वी गिरीश महाजनांची भेट अन्... रात्री 12 वाजता सांडला रक्ताचा सडा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल