सोशल मीडियावर स्टेटस व्हिडीओ
हत्या झालेल्या आकाश मोरे याने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्टेटस व्हिडीओ पोस्ट केला होता. आकाश सोशल मीडियावर अॅक्टिव असल्याने तो सतत व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत होता. अशातच आता 'छातीत गोळी' मारण्याचा इशारा देणाऱ्या आकाशचा शेवट तसाच झाल्याचं पहायला मिळतंय. त्याची रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
advertisement
रीलमध्ये काय म्हटलंय?
शेठ तुम्ही हवेत गोळ्या मारता आम्ही छातीवर गोळ्या मारतो, कसं रोख आणि ठोक... जिस दिन मारूंगा छातीपर मारूंगा, अशा आशयाची रील आकाशने सोशल मीडियावर शेअर केली होती. तसेच बदला लेने मै देर हो सकती है.. उसे भुलाया नही जा सकता, असं आणखी एक पोस्ट देखील आकाशने केली होती. वेट धमाका होगा, अशी कमेंट देखील त्याने यावेळी केली होती.
12 गोळ्या झाडल्या
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात आकाशच्या शरीरावर अनेक ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याच्या कपाळावर 1, डोक्यावर 4, पाठीवर 4, छातीवर 1 आणि डोक्याच्या मागे 2 अशा एकूण 12 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इतक्या गोळ्या लागल्यामुळे आकाशचे शरीर अक्षरशः छिद्रे पडल्यासारखे झाले होते. या हत्येनंतर मारेकरी नीलेश अनिल सोनवणे आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार हे दोघे जळगावच्या दिशेने दुचाकीवरून पळून गेले. मात्र, काही वेळानंतर त्यांनी पोलीस चौकीत सरेंडर केलं.
वाळू व्यवसायातील वाद
दरम्यान, या थरारक घटनेच्या मुळाशी वाळू व्यवसायातील वाद आणि वर्चस्व संघर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सोशल मीडियावरील स्टेटस, रील्स आणि त्यातून निर्माण झालेली वैमनस्ये यांचाही पोलीस सखोल तपास करत आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डिटेल्स आणि सोशल मीडिया पोस्ट यांची कसून चौकशी करत आहेत. पाचोरा शहरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
