मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. ते आज जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'लक्षात ठेवा तुम्ही पालकत्व स्विकारलं आहे. घटनेच्या पदावर तुम्ही बसला आहात, तुम्हाला मराठा समाजाविषयी आकस व्यक्त करता येणार नाही. तुम्ही मराठ्यांचा द्वेष करू शकत नाही. आमच्या जीवावर तुम्ही मोठे झाला आहात. छगन भुजबळ यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पुढे-पुढे करू नका. भुजबळ यांचं ऐकूण आमच्यावर अन्याय कराल तर तुम्हाला जड जाईल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
'ते पुढे बोलताना म्हणाले की, 'आरक्षणावरून तुम्ही राजकारण करू नका, अन्यथा ते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा अडचणीचं ठरू शकतं. सरकारशी आमचं बोलणं झालेलं आहे, तुम्हाला माहित नाही असं नाटक करू नका व नाटक कंपनीत तुम्ही सामील होऊ नका', असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
