घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पशुधनाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केल्याने १० ते १५ जणांच्या टोळक्यानं चोपडा येथील सपोनि अजित सावळे आणि पोलीस कर्मचारी संतोष पारधी यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना जुन्या यावल रोडवर रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
advertisement
पशुधनाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली. यानंतर साने गुरुजी वसाहतीमधील १० ते १५ जण पोलीस ठाण्यात आले. कारवाई केल्याबाबत विचारणा करू लागले. पोलिसांनी त्यांना तिथून हाकलून लावले. यानंतर सावळे व पारधी हे रात्री ११ वाजता पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये अजित सावळे हे जखमी झाले आहेत. त्यांच्या कानाला अंतर्गत दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या डाव्या हाताला जबर मार लागला आहे. याप्रकरणी दहा आरोपी निष्पन्न झाले आहेत, त्यातील सात जणांना अटक करण्यात आलं आहे. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
