एकनाथ खडसे यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार खडसे आज नियमित तपासणीसाठी मुक्ताईनगर येथील खाजगी रुग्णालयात गेले होते. यादरम्यान तपासणी ही तपासणी केली असता त्यात काही बदल आढळून आले. त्या बदलानुसार पुढच्या तपासण्या करण्यासाठी तातडीने जळगावला रवाना झाले. या ठिकाणी जळगाव शहरातील गजानन या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तपासण्या करण्यात येत आहेत.
advertisement
खडसेंच्या प्रकृती बाबतची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे ह्या या सुद्धा रुग्णालयात दाखल झालेले आहेत. या ठिकाणी तपासण्या केल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती विश्वासनिय सूत्रांकडून मिळाली आहे.
डॉक्टर काय म्हणाले?
एकनाथ खडसे यांना दोन दिवसांपासून छातीमध्ये त्रास सुरू होता. त्यामुळे ते दोनतीन तपासणीसाठी आले होते. या तपासण्यामध्ये छातीमध्ये काही बदल जाणवले. त्यामुळे पुढच्या तपासणीसाठी त्यांना मुंबईत हलवण्यात येणार आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. पण, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांनी आमच्यासोबत गप्पाही मारल्याचे डॉक्टर विवेक चौधरी यांनी सांगितले.
