नेमकं काय म्हणाले खडसे?
एकनाथ खडसे यांनी ट्विट करत आपल्या भाजप प्रवेशांच्या चर्चेबाबत खुलासा केला आहे. 'गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे.' असं ट्विट एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
advertisement
अशोक चव्हाणांचा आज भाजपात प्रवेश
दरम्यान दुसरीकडे आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण आज भाजपात प्रवेश करणार आहेत. चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाची भाजप कार्यालयात जोरदार तयारी करण्यात आली आहे. चव्हाण यांच्यासोबतच नांदेडचे काही माजी नगरसेवक देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
