नेमकं काय म्हणाले खडसे?
सरकारने कितीही सांगितलं की मराठा सामाजाच्या मागण्या मान्य झाल्या तरी या सरकारकडून एकाएकी आरक्षणाच्या मागण्या मान्य होणे अवघड आहे. हे सरकार वारंवार आरक्षणाबाबत फक्त आश्वासन देत आहे. ओबीसीतून आरक्षण देऊ असं सरकार म्हणत आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसीला धक्का न लागता आरक्षण द्यायचं आहे. सरकारने जर फक्त समाधानासाठी आरक्षणाचा जीआर काढला असेल तर तो न्यायालयात टिकणार नाही असं खडसे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू होती. तब्बल तीन तासांच्या चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी जीआर आपले वकील आणि मराठा बांधवांना वाचून दाखवला. त्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Jan 27, 2024 10:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
जरांगेंना सरकारने अध्यादेश दिला, पण…, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला संशय
