TRENDING:

Eknath Khadse : 'दाऊद अन् छोटा शकील तुम्हाला मारणार'; एकनाथ खडसेंना धमकीचे फोन

Last Updated:

चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून एकनाथ खडसे यांना धमकी दिली गेलीय. या प्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इम्तियाज अहमद, जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. दाऊद आणि छोटा शकील गँगकडून त्यांना धमकी आलीय. चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून एकनाथ खडसे यांना धमकी दिली गेलीय. या प्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या गँगकडून धमकीचा कॉल आला आहे.
एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एकनाथ खडसे यांना १५ आणि १६ एप्रिल रोजी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन आला. देशासह परदेशातील क्रमांकांचा यामध्ये समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.  धमकी देणाऱ्याने छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार असल्याचं सांगितलं. तसंच तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. हे लोक तुम्हाला मारणार आहेत असं पुन्हा कॉल करून धमकी देणाऱ्याने सांगितलं. फोनचे लोकेशन हे अमेरिका, उत्तर प्रदेशातल्या लखनऊमधले असल्याची माहिती समजते.

advertisement

एकनाथ खडसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, याचे गांभीर्य पाहून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये जाणार असल्याचा खुलासा केला आहे. खडसेंनी घरवापसी कऱणार असल्याचं सांगितलं असलं तरी त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही.

advertisement

जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या दिवशी त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंबाचे दरही तेजीत, आल्याची काय स्थिती?
सर्व पहा

खडसेंचा पक्ष प्रवेश कधी होणार हे अद्याप समोर आलेलं नाही. त्यांच्या घरवापसीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, भाजप प्रवेशाबाबत अद्याप केंद्रातील वरिष्ठांनी काही कळवलेलं नाही. पण ते पक्ष प्रवेश करत असतील तर त्यांचं स्वागत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Eknath Khadse : 'दाऊद अन् छोटा शकील तुम्हाला मारणार'; एकनाथ खडसेंना धमकीचे फोन
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल