TRENDING:

Assembly Election : मोठी बातमी! महायुतीमध्ये राष्ट्रवादीला हव्यात विधानसभेच्या इतक्या जागा

Last Updated:

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे, आता राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादीकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव, नितीन नांदूरकर प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आलं आहे, दरम्यान आता राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशी लढत यावेळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यापूर्वी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या 80 जागांवर दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेच्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
News18
News18
advertisement

नेमकं काय म्हणाले अनिल पाटील 

विधानसभेच्या 80 जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चार जागांचा समावेश आहे. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून यावर कमी-अधिक काय असेल तो निर्णय होईल, असं पाटील यांनी म्हटलं आहे. लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांत काय भूमिका राहील? या प्रश्नावर बोलताना अनिल पाटील म्हणाले, की महायुतीमध्ये असताना किंवा नसताना हा विचार करण्याची आवश्यकता नाही. जे निकष ठरले आहेत. त्यानुसार छगन भुजबळांनी 90 जागांची मागणी मागच्या मेळाव्यात केली असली, तरी किमान 80 जागा राष्ट्रवादीने लढविल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंबाचे दरही तेजीत, आल्याची काय स्थिती?
सर्व पहा

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण, निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा केली पाहिजे, आणि त्यासाठी आतापासूनच कामाला लागलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता महायुती उमेदवाराच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तालुकाध्यक्ष व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं म्हणून उत्तर महाराष्ट्रात आठपैकी दोन जागा महायुतीच्या निवडून आल्या आहेत. या विजयात भाजप, शिवसेना यांच्या बरोबरीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही सिंहाचा वाटा आहे. असं पाटील यांनी म्हटलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Assembly Election : मोठी बातमी! महायुतीमध्ये राष्ट्रवादीला हव्यात विधानसभेच्या इतक्या जागा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल