भुसावळ इथं राहणाऱ्या भारंबे कुटुंबातील चौघांचा बस अपघाता मृत्यू झाला. गणेश भारंबे हे रेल्वेत कंत्राटी कर्मचारी होते. त्यांच्यासह आई सुलभा भारंबे, पत्नी योगिनी आणि मुलगी परी हे नेपाळला गेले होते. पशुपतीनाथाच्या दर्शनाला जात असताना नदीत त्यांची बस कोसळून २७ जण मृत्युमुखी पडले.
advertisement
गणेश भारंबे यांच्यासह चौघांचा बस दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांनी गेल्याच वर्षी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती. गेल्या काही वर्षांपासून ते पायी पंढरपूर वारीला जात होते. अपघाताच्या दोन दिवस आधीच गणेश भारंबे यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तेव्हा योगिनी यांनी घरी भावाला फोन करून प्रवास चांगला सुरू असल्याचं सांगितलं. पण त्यानंतर शुक्रवारी थेट अपघाताची बातमी आली.
आता कुटुंबात फक्त आजी आणि नातू उरले!
वरणगावातल्या गणेशनगर भागात संदीप सरोदे यांचे कुटुंबीय तीर्थदर्शनासाठी नेपाळला गेले होते. यात संदीप सरोदे हे पत्नी, मुलगी, भाऊ, वहिणी आणि पुतण्यासह गेले होते. अपघातात संदीप सरोदे, त्यांची पत्नी, मुलगी आणि पुतण्याचा मृत्यू झाला. तर भाऊ आणि वहिणी गंभीर जखमी झाले आहेत. संदीप सरोदे यांच्या आई आणि मुलगा गेले नव्हते. त्यामुळे कुटुंबात केवळ आजी आणि नातूच राहिले आहेत.
