संदीप सरोदे आणि त्यांची पत्नी पल्लवी सरोदे धार्मिक होते. गेल्याच महिन्यात ते आळंदी ते पंढरपूर पायी वारीला गेले होते. विटभट्टीचा व्यवसाय करणाऱ्या संदीप सरोदे यांच्या संपूर्ण कुटुंबावरच काळाने घाला घातला. सरोदे कुटुंबातला शुभम हा पुण्याला नोकरीला आहे. संदीप सरोदे यांनी त्यालाही सोबत येण्यासाठी विचारलं होतं. पण सुट्टी न मिळाल्यानं त्याला जाता आलं नाही. शुक्रवारी सकाळी शुभमला टीव्हीवर नेपाळमध्ये अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला ही बस आपल्याच आई-वडिलांना नेत असलेली होती हे समजल्यानंतर मोठा धक्का बसला.
advertisement
..आणि 26 रुग्णवाहिका 26 मृतदेह घेऊन निघाल्या गावाकडे, VIDEO
नेपाळळा जळगावमधून जवळपास १०० लोक देवदर्शनासाठी गेले होते. अयोध्येत देवदर्शन झाल्यानंतर ते नेपाळला काठमांडूच्या दिशेने निघाले होते. तेव्हा नदीत बस कोसळली. या बसमधून ४१ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी २७ जणांचा मृत्यू झाला. यातील २५ जण जळगावचे होते. तर १६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर काठमांडू इथं उपचार सुरू होते. जखमींवर उपचारासाठी भारत सरकार नेपाळसोबत संपर्कात आहे. तसंच नेपाळमधून भारतात हवाई दलाच्या विमानाने मृतदेह आणण्यात आले. तिथून जळगावात मृतदेह आणले असून आज रात्री अंत्यसंस्कार केले जातील.
