TRENDING:

महाराष्ट्रातील 41 पर्यटकांच्या बसचा नेपाळमध्ये अपघात, 14 जणांचा मृत्यू

Last Updated:

नेपाळमध्ये बस नदीत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत १४ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आलीय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव : नेपाळला पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील 41 जणांच्या बसचा भीषण अपघता झाला. बस नदीत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत १४ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश असल्याची माहिती समोर आलीय. मंत्री अनिल पाटील यांनी माहिती देताना म्हटलं की, तासाभरापूर्वी मला ही माहिती मिळालेली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी यांच्याशी मी तात्काळ संपर्क केला आहे. - 41 भाविक दर्शनासाठी गेले होते आणि ती बस आता नदीमध्ये कोसळलेली आहे अशी प्राथमिक माहिती आहे.अंदाजे 15 ते 16 मृतदेह सापडले असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
News18
News18
advertisement

पोखराहून काठमांडूला निघालेल्या पर्यटकांची बस मुखलिसपूरजवळ दरीत कोसळली. गोरफूरच्या केसरवानी ट्रॅव्हल्समध्ये महाराष्ट्रातील ४१ प्रवासी होते. गोरखपूरच्या चालकासह १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रयागराज रेल्वे स्थानकाहून महाराष्ट्रातील ११० पर्यटकांचा ग्रुप चित्रकूटला गेला. तिथून अयोध्या, लुम्बिनी मार्गे ते नेपाळच्या पोखरा इथं पोहोचले. आज ते काठमांडूला निघाले होते.

Bus Accident : नदीत कोसळून बसचा चक्काचूर, मृतदेहांचा खच; जखमींचा आक्रोश, मन सुन्न करणारे PHOTO

advertisement

नदीत कोसळून बसचा पुरता चक्काचूर झाला होता. बसच्या वरचं छत उडालं होतं, पुढच्या भागाचा सांगाडा वेगळा झाला होता. काहीजण वेदनेनं विव्हळत होते, वाचवण्यासाठी याचना करत होते.नदीजवळच्या खडकावर मृतदेहांचा खच पडला होता. रक्तानं दगड माखले होते. जखमींचा आक्रोश होता. मन सुन्न करणारे अपघाताचे फोटो समोर आले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंबाचे दरही तेजीत, आल्याची काय स्थिती?
सर्व पहा

स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन विभागाचे कर्मचारी प्रवाशांना रेस्क्यू करत आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवलं जात आहे. नेपाळच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बस पोखराहून काठमांडूला जात होती. अपघाता मृत्यूमुखी पडलेल्यांची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. त्यांची नावे समजू शकली नाहीत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
महाराष्ट्रातील 41 पर्यटकांच्या बसचा नेपाळमध्ये अपघात, 14 जणांचा मृत्यू
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल