पोखराहून काठमांडूला निघालेल्या पर्यटकांची बस मुखलिसपूरजवळ दरीत कोसळली. गोरफूरच्या केसरवानी ट्रॅव्हल्समध्ये महाराष्ट्रातील 41 प्रवासी होते. गोरखपूरच्या चालकासह 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रयागराज रेल्वे स्थानकाहून महाराष्ट्रातील 110 पर्यटकांचा ग्रुप चित्रकूटला गेला. तिथून अयोध्या, लुम्बिनी मार्गे ते नेपाळच्या पोखरा इथं पोहोचले. आज ते काठमांडूला निघाले होते.
नदीत कोसळून बसचा पुरता चक्काचूर झाला. बसच्या वरचं छत उडालं होतं, पुढच्या भागाचा सांगाडा वेगळा झाला होता. काहीजण वेदनेनं विव्हळत होते, वाचवण्यासाठी याचना करत होते. नदीजवळच्या खडकावर मृतदेहांचा खच पडला होता. रक्तानं दगड माखले होते. जखमींचा आक्रोश होता. मन सुन्न करणारे अपघाताचे फोटो समोर आले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
advertisement
वाचा - ती चिमुरडी सोडून गेली, पण आई-बापांची मारेकऱ्यालाच मदत, जमिनीतून सत्य आलं समोर
मयतांची नावे
सरला राणे, भारती जावळे, तुळशीराम तायडे, सरिता तायडे, संदीप सरोदे, पल्लवी सरोदे, अनुप सरोदे, गणेश भारंबे, नीलिमा धांडे, पंकज भंगाळे, परि भारंबे, अनिता पाटील, विजया जावळे, रोहिणी जावळे, प्रकाश कोळी, सुधाकर जावळे, सुलभा भारंबे, सुहास राणे, सुभाष रडे, रिंकी राणे, निलीमा जावळे, मुस्तफा मुर्तीजा चालक, रामजी मुन्ना वाहक अशी मृतांची नावे आहेत.
