जळगाव, 27 ऑगस्ट : पाणीपुरवठा खात्याचा बजेट हा फक्त 700 करोड रुपये असल्याने पाणीपुरवठा खातं हे कोणी घेत नव्हतं असं मोठं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले आहे. पाणीपुरवठा खात्याचा बजेट हा फक्त सातशे करोड रुपये होता मात्र केंद्रात दाढीवाले नरेंद्र मोदी राज्यात दाढीवाले एकनाथ शिंदे आणि दाढीवाला गुलाबराव पाटील हा योगायोग आला त्यामुळे मला पाणीपुरवठा खाते मिळाले म्हणून मी नशीबवान असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच पाणी देताना आम्ही कधीही पक्ष पाहिला नाही राष्ट्रवादी असो वा काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचा ब गट असो किंवा शिवसेनेचा ब गट आम्ही सर्वांना पाणी दिल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. ते जळगावात बोलत होते.
advertisement
राष्ट्रवादी आमच्याबरोबर आल्याने आमच्यावरचे 50 खोक्यांचे आरोप बंद : पाटील
वर्षभर आमच्यावर पन्नास खोक्यांचे आरोप करण्यात आले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याबरोबर आल्याने आमच्यावरचे 50 खोक्यांचे आरोप बंद झाले असून राष्ट्रवादीला कोणी गद्दारही म्हणत नाही व खोक्याचाही आरोप करत नाही असे मोठे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. दरम्यान राज्यात सध्या पक्षापेक्षा कोण किती काम करतो यावर जनता भर देत असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.
वाचा - 'थेट अमेरीकेच्या अध्यक्षांना चिठ्ठी..' मंत्री नितीन गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा, पाहा व्हिडीओ
बिन छताचा धंदा करणारा एकमेव माणूस म्हणजे शेतकरी : पाटील
बिनछताचा धंदा करणारा एकमेव माणूस म्हणजे हा शेतकरी असून आम्ही राजकारणी पक्षात नाही जमलं तर पक्ष बदलतो. मात्र, शेतकरी कितीही नुकसान झालं तरी तिथेच राहतो असे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा सत्कार होतो. मात्र, तरी देखील तिथे गमावले तिथूनच मिळवणार हा पण घेऊन शेतकरी कामाला लागत असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.
