दिवाळी, छटपूजेनिमित्त रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी राहणार आहे. प्रवाशांनी पूर्वीच तिकीट काढून ठेवली आहेत. मात्र, आता वेळेवर तिकीट काढणाऱ्यांची प्रतीक्षा यादी ही १०० पेक्षा जास्त दिसत आहे. यामुळे वेळेवर प्रवासाचे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना आता तात्काळ तिकिटाशिवाय पर्याय नाही.
पुणे, मुंबई व सूरतकडून भुसावळकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या या २६ ते ३१ ऑक्टोबर या काळात फुल्ल असून, अनेक गाड्यांना नोरूम आहे. त्यामुळे त्या गाड्यांचे तिकीट मिळणे बंद झाले आहे. दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून तिकीटे काढून ठेवली आहे.
advertisement
भाडेवाढीची भीती
दिवाळीनिमित्त चाकारमाने मोठ्या संख्येनं गावी जातात असतात, रेल्वे गाड्या आधीच फूल्ल झाल्या आहेत. प्रतीक्षा यादी लागली आहे. एसटी महामंडळाच्या बस देखील मर्यादीत असल्यामुळे अनेकजण या काळात खासगी ट्रॅल्वल्सने प्रवास करतात. त्यामुळे भाडेवाढीची शक्यता आहे.
