चाळीसगाव शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी शहर पोलिसांनी अवैध धंद्यावर बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील बस स्थानकामागील अवैध धंद्याच्या टपऱ्यांवर चाळीसगाव शहर पोलिसांनी नगरपालिका प्रशासनाच्या मदतीनं बुलडोझर चालवला आहे. या टपऱ्या उद्धवस्त करण्यात आल्या आहेत.
सध्या हत्या, टोळी युद्ध, हाणामारी, गोळीबार यासारख्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीसाठी अवैध धंदे जबाबदार असल्याची चर्चा चाळीसगाव शहरात सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चाळीसगाव पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला सोबत घेऊन संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये अवैध धंदेसुरू असलेली ठिकाणं जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
advertisement
