नेमंक काय म्हणाले रोहित पवार?
'राज ठाकरे हे दिल्लीला जाणं तसं बघितलं तर आम्हाला पटत नाही. जे जे दिल्लीला जातात, तिथल्या लोकांचं त्यांच्याबद्दलचं मत फार वेगळं होतं. त्यामुळे अजून पुढे न जाता त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा आणि भाजपाच्या विरोधात निर्णय घ्यावा. अशी विनंती त्यांचे कार्यकर्ते सुद्धा करत आहेत' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, 'मी असं आवाहन केलं होतं की, 2019 ला राज ठाकरे साहेबांनी जी भाषणं केली होती ती, शेतकर्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि युवा पिढीच्या बाजुनं होती. बेरोजगारीचा प्रश्न 2019 ला जेवढा अडचणीचा होता, त्यापेक्षा अधिक तो आज अडचणीचा झाला आहे. 2019 ला ते भाजपाच्या विरोधात आणि तरुण पिढीच्या बाजूनं बोलले होते. तर आमची अपेक्षा आहे की, सध्या बेरोजगारीचा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे, त्यामुळे राज ठाकरे यांनी युवकांची भूमिका घेऊन त्यांच्या बाजुनं उभं राहत भाजपच्या विरोधात लढलं तर ते जास्त योग्य ठरू शकतं. '
'राज ठाकरे यांनी नेहमी मराठी अस्मिता जपलीआहे. मात्र भाजपाचं सरकार जेव्हा केंद्रात आलं तेव्हापासून महारष्ट्राचं महत्त्व कमी करून गुजरातचं महत्त्व वाढवण्याचं काम सुरू आहे. स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून आम्हाला ते पटत नाही' असंही यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
