नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
पुढे बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, तुम्ही मंत्री असताना तरी एकच सरकार होते, मात्र आमचं तीन जनांचं सरकार आहे. वरती भाजप . कंबर शिवसेनेचं आणि हात पाय राष्ट्रवादीचे असं आमचं सरकार आहे. ते विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.
advertisement
चौफेर फटकेबाजी
काही दिवसांपूर्वीच यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत गेलेल्या अनिल भाईदास पाटील यांचा सत्कार केला होता, आणि आता हे सांगतात की आम्ही शरद पवर यांच्या गटात आहोत. शरद पवारांच्या की अजित पवारांच्या आदेशाचं पालन करतात हे आधी सिध्द करा असं आव्हानही यावेळी गुलाराव पाटील यांनी नाव न घेता देवकर यांना केलं आहे. अनिल दादांचा सत्कार करणारे पण तुम्हीच. शरद पवार जिंदाबाद म्हणणारे पण तुम्हीच आणि विरोध करणारे पण तुम्हीच. हे लोक स्टेबेल नाहीयेत असं पाटील यांनी म्हटलं आहे.
