जळगाव : पाळधी इथं एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजकीय नेत्यांबाबत धक्कादायक असं वक्तव्य केलंय. जेल हे राजकारण्याचं क्वालिफिकेशन आहे. आंदोलनात जर कार्यकर्ता जेलमध्ये गेला नाही तर तो कार्यकर्ता होऊ शकत नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. जेलमध्ये जाणं ही राजकारणाची पदवी आहे. बॅचलर ऑफ जेल ही माझी पदवी असल्याचं मी स्वत: जाहीर सभांमध्ये सांगायचो असंही गुलाबराव पाटील म्हणाले. पाळधी येथे शिक्षक सन्मान सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
advertisement
गुलबाराव पाटील म्हणाले की, जेल हे राजकारण्यांचं कॉलिफिकेशन असून आंदोलनामध्ये जर कार्यकर्ता जेलमध्ये गेला नाही तर तो कार्यकर्ताच होऊ शकत नाही. जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या लढ्याकरता आंदोलन करून जेलमध्ये जाणे हे त्या राजकारणाची पदवी असून बॅचलर ऑफ जेल ही आपली पदवी असल्याचे मी स्वतः जाहीर सभेत सांगायचो.
राज्यात महायुतीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. लाडकी बहीण योजना, महिला अत्याचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याचं प्रकरण यामुळे सध्या वातावरण तापलं आहे. विरोधकांवर टीका करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, स्वतःला आपत्य व्हायचं नाही आणि दुसऱ्याचा झालं ते पाहायचं नाही विरोधकांचा हा प्रकार चुकीचा आहे. विद्यार्थी वारकरी दिव्यांग यांच्यासाठी विविध योजना या राबवल्या जात असताना विरोधकांकडून मात्र त्यावर टीका केली जात असल्याने गुलाबराव पाटलांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला आहे.
