घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील ऐनपूर गावात ही घटना घडली आहे, पैशांच्या देवाण-घेवाणीतून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. पैशांच्या देवाण -घेवाणीतून दोन गटात वाद झाला. वाद वाढल्यानं हाणामारीला सुरुवात झाली, आणि त्यानंतर दगडफेक करण्यात आली. या घटनेत दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चार ते पाच जण जखमी झाले आहेत. गावात तणावपूर्ण शांतता असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे.
advertisement
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांच्यासह आरसीपी व दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सद्यास्थितीमध्ये गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाला छावणीचं स्वरुप आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
