TRENDING:

Gold-Silver Rate : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; चांदीही महागली

Last Updated:

दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर कमी होतील अशी ग्राहकांना अपेक्षा होती.  मात्र सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव, 17 नोव्हेंबर, नितीन नांदूरकर : दिवाळीमध्ये सोने खरेदीकडे नागरिकांचा मोठा कल दिसून आला, त्यामुळे साठ हजारांवर सोन्याचे भाव पोहोचले. सोन्याचे दर वाढले असतानाही दिवाळीत देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेला जळगावचा सराफ बाजार ग्राहकांनी गजबजलेला पाहायला मिळाला.
News18
News18
advertisement

दिवाळीनंतर सोने-चांदीचे दर कमी होतील अशी ग्राहकांना अपेक्षा होती.  मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे त्याचा मोठा परिणाम सोने-चांदीच्या दरावर झाला आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा 700 रुपये तर चांदीचे दरात प्रति किलो मागे 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

सोने चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम बारारपेठांवर देखील झाला आहे. परिणामी दागिने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे.  दिवाळीत गजबजलेल्या  जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांची संख्या सध्या मंदावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सोने-चांदीच्या दरात ही वाढ झाल्याचं सुवर्ण व्यावसायिकांचं म्हणणं आहे, मात्र सोन्याचे दर वाढत असल्यामुळे ग्राहक सध्या सोन्या-चांदीच्या खरेदीकडे पाठ फिरवत असल्याचं व्यावसायिकांनी म्हटलं आहे. सोने-चांदीच्या दरामध्ये अचानक झालेल्या दरवाढीमुळे गृहिणींचं देखील बेजेट कोलमडलं आहे. त्यामुळे त्यांना यंदा पाहिजे तशी दागिन्यांची खरेदी करता आली नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Gold-Silver Rate : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; चांदीही महागली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल