नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. . केंद्र सरकारच्या एक देश एक नाव या भूमिकेवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. नशीब भारत तरी म्हणताय, नाहीतर स्वतःचे नाव देतात की काय असं वाटलं होतं असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. जेव्हा तुम्ही शिवसेनेच्या नरडीला हात लावला तेव्हाच मी ठरवलं तुम्हाला सोडणार नाही. पूर्वी आले देवाजीच्या मना असे होते, आता आले मोदींच्या मना लगेच अधिवेशन बोलावलं असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
advertisement
पोस्टरवरून निशाणा
दरम्यान एक सप्टेंबरला मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली होती. या बैठकीपूर्वी मुंबईमध्ये शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टवरून देखील उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांनी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे बॅनर लावले, हो कधीच होऊ देणार नाही. मात्र आपण पण मग उत्तर दिलं, कमळाबाईची पालखी होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
