नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं आहे. आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून आमचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे. दिव्यांग मंत्रालय दिलं नसतं तर आम्ही कधीच बाहेर पडलो असतो, मात्र एकनाथ शिंदे यांनी मोठी भूमिका घेतली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत राहणं आमचं कर्तव्य आहे, आम्ही त्यांच्यासोबत राहणार असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी रवी रांणाच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे. बघू घोडं आणि मैदान जवळच आहे, तेव्हा कोण काय करते ते असं त्यांनी यावेळी म्हटलं.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काल मराठवाड्यासाठी जाहीर झालेल्या पॅकेजवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सभागृहात फक्त टाळ्या वाजविण्यासाठी भाषणं होतात, मते घेण्यासाठी घोषणा होतात, मात्र अंमलबजावणी होत नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी शहीद स्थळांसाठी 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. अजित पवार यांनी देखील अनेक घोषणा केल्या, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
