TRENDING:

सावधान! अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जॉइन होत आहात? जळगावात महिलेसोबत घडलं भयानक कांड, 1 कोटी रुपये गमावले

Last Updated:

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, महिलेला तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव, नितीन नांदूरकर, प्रतिनिधी : जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. एका महिलेला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन होण्यास सांगून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. महिलेसह तिचा पती, सासू आणि नणंदेच्या खात्यामधून देखील रक्कम स्विकारण्यात आली आहे. फसवणूक झाल्याचं लक्ष येताच चार जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनल भीमराव उपलवार असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे.
News18
News18
advertisement

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोनल उपलवार यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या एका ग्रुपला जॉइन होण्यास सांगितलं. त्यानंतर ट्रेडिंगच्या नावाखाली त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले. पैसे गुंतवण्याच्या नावाखाली उपलवार यांना तब्बल 1 कोटी 5 लाख 34 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. सोनल यांचे पती, सासू आणि नणंदेच्या बँकखात्यातून देखील रक्कम उकाळण्यात आली आहे. या ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी चार जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
काळेवाडीच्या महिलांची भरारी! घरात बसून कमावले तब्बल 17 लाख, दिवाळीत असं काय केलं
सर्व पहा

जळगावातील हरेश्वरनगरमधील रहिवासी असलेल्या सोनल उपलवार यांचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक एका ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आला. त्यानंतर तिघांनी  व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून त्यांना मेसेज करत त्यांच्याकडून ट्रेडिंगच्या नावाखाली वेळोवेळी पैसे उकळण्यात आले. 16 फेब्रुवारी ते 28 मार्च दरम्यान सोनल यांच्यासह त्यांचे पती, नणंद आणि सासूच्या बँक खात्यातून तब्बल 1 कोटी 5 लाख 34 हजार रुपये उकळण्यात आले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या प्रकरणात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
सावधान! अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जॉइन होत आहात? जळगावात महिलेसोबत घडलं भयानक कांड, 1 कोटी रुपये गमावले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल