घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ येथे उधारीच्या पैशावरून 31 वर्षीय तरुणाची त्याच्या मामीनेच आपल्या नातेवाईकांच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. नजीर शेख असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. नजीर शेख या तरुणाने आपल्या मामे बहिणीच्या विवाहासाठी उधारीवर पैसे दिले होते. त्याने मामीकडे आपले पैसे परत मागितले. पैसे परत मागितल्याचा राग आल्यानं मृत तरुणाच्या मामीनं आपला भाऊ आणि भाच्याच्या मदतीनं तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नजीर शेख याचा मृत्यू झाला आहे.
advertisement
घटनेनं खळबळ
ममीनेच आपल्या भाच्याची हत्या केली आहे. उधारीच्या पैशाच्या वादातून हा खून झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडालीआहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
October 01, 2023 3:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon News : उधारीचे पैसे मागणं जीवावर बेतलं; सख्खा मामीनेच भाच्याला संपवलं
