TRENDING:

Jalna : पहिल्या पावसाने घात केला, 2 सख्या भावांचा अंदाज चुकला, जालन्यातील ह्रदयद्रावक घटना

Last Updated:

जुनेद सय्यद आसेफ वय 19 वर्ष आणि अयान सय्यद आसेफ वय 15 वर्ष राहणार शेरसवार नगर जालना असं मृत भावांचं नाव आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास हे भाऊ पोहण्यासाठी शहरातील मोती तलावात उतरले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : जालन्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. जालना शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जुनेद सय्यद आसेफ वय 19 वर्ष आणि अयान सय्यद आसेफ वय 15 वर्ष राहणार शेरसवार नगर जालना असं मृत भावांचं नाव आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास हे भाऊ पोहण्यासाठी शहरातील मोती तलावात उतरले होते.
advertisement

पाऊस झाल्यामुळे तलावाचा पाणीसाठा वाढल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाने दोन तास परिश्रम घेऊन मृतदेह बाहेर काढले आहे. दरम्यान या दोन भावांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहेत

advertisement

आशियातील सर्वात छोटं रेल्वे जंक्शन! शांत अन् सुंदर वातावरणातील 'हे' जंक्शन पार पाडतं मोठी जबाबदारी

जालना शहरातील मोती तलाव परिसरात शहरातील अनेक जण फिरण्यासाठी येत असतात. काही तरूण या तलावात पोहण्याचे प्रयत्न देखील करतात. जालना शहरातील जुने आणि आसिफ हे देखील दुपारी 1 वाजेच्या दरम्यान पोहण्यासाठी तलावात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. अग्नीशामक दलाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी शोधमोहिम सुरू करून अवघ्या 1 ते दीड तासांत दोन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पानपट्टे यांनी दिली आहे. दरम्यान मोती तलाव इथे पोहण्यासाठी येवू नये, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna : पहिल्या पावसाने घात केला, 2 सख्या भावांचा अंदाज चुकला, जालन्यातील ह्रदयद्रावक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल