TRENDING:

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यात मोठं अपडेट, तपास यंत्रणा थेट जालन्यात, त्या कुटुंबाकडे का केली चौकशी?

Last Updated:

Pahalgam Attack: पहलगाम हल्ला प्रकरणात महत्त्वाची अपडेट आहे. दहशतवाद विरोधी पथकाने जालन्यातील राऊत कुटुंबाची चौकशी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश स्तब्ध आहे. तब्बल 26 निष्पाप नागरिकांचा गोळ्या झाडून खून करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्याचे काम तपास संस्थांकडून केले जात आहे. या घटनेचा तपास देखील उच्चस्तरीय पातळीवर सुरू आहे. पहलगाम येथे आलेल्या पर्यटकांची तसेच स्थानिकांची चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणात जालन्यातील राऊत कुटुंबाची चौकशी झाल्याची माहिती आहे.

advertisement

जालन्यातील राऊत कुटुंब देखील पर्यटनासाठी पहलगाम येथे गेले होते. 21 एप्रिल रोजी ते पहेलगाम इथेच थांबले होते. दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांचे स्केचेस जारी केले. यातील एका दहशतवाद्याने आपल्याशी संवाद साधल्याचा दावा आदर्श राऊत यांनी केला होता. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथक जालन्यात दाखल झाले आणि त्यांनी राऊत कुटुंबाकडे चौकशी केली.

advertisement

बापमाणूस! लग्न सोहळ्यात एकाचवेळी 52 मुलींना दिलं सोनं, आतापर्यंत 765 मुलींचं केलं कन्यादान

दहशतवाद विरोधी पथकाने जालना येथे येऊन एक ते दीड तास राऊत कुटुंबाची चौकशी केल्याची बाब समोर आली आहे. तपास संस्थांना आवश्यक असलेली सर्व माहिती पुरवली असून आगामी काळात काही मदत लागल्यास ती करण्यास तयार असल्याचं आदर्श राऊत यांनी सांगितलं.

advertisement

मेलद्वारे दिली होती माहिती

आदर्श राऊत यांनी राष्ट्रीय तपास संस्थेला याबाबत मेल द्वारे देखील माहिती दिली होती. याच आधारे दहशतवाद विरोधी पथकाने राऊत कुटुंबाची चौकशी केली असून यातून काही धागेदोरे हाती लागतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दहशतवादी पथकाने केलेली चौकशी गोपनीय असून याबाबतचा अधिकचा तपशील देण्यास तपास संस्थांनी मज्जाव केल्याने आदर्श याने सांगितले.

advertisement

पुन्हा होऊ शकते चौकशी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

तपास संस्थांना आवश्यकता वाटल्यास ते राऊत कुटुंबाची आणखी चौकशी करू शकतात. तपास संस्थांना शक्य ती सगळी माहिती पुरवली असून भविष्यातही तपासात सहकार्य करणार असल्याचे आदर्श राऊत यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यात मोठं अपडेट, तपास यंत्रणा थेट जालन्यात, त्या कुटुंबाकडे का केली चौकशी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल