राज्यात सरकाराने जालना जिल्हात केवळ 7 केंद्रांना परवानगी दिली आहे. नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीची स्थिती काय आहे. याची पडताळणी करण्यासाठी लोकल18 जेव्हा रामनगर इथे पोहचले तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. रामानगर येथे 2019 पासून आयडियल फार्म प्रोड्यूसर कंपनी सरकारी हमीभावाने सोयाबीन खरेदी करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याच केंद्राबाबत माहिती आहे.
advertisement
अनेक शेतकरी या केंद्रावर येवून विचारपुस करत आहेत. मात्र या केंद्रांसह राज्यातील सर्वच फार्म प्रोडूसर कंपन्यांना सरकारने सोयबीन खरेदी ची परवानगी दिलेली नाही.परंतु, सरकारने कुलस्वामिनी तुळजाई नावाच्या ज्या खरेदी केंद्रावा सोयाबीन खरेदीची परवानगी दिली आहे. त्या केंद्रावर सोयाबीन प्रक्रिया 19 नोव्हेंबर रोजी पर्यंत सुरूच झालेली नाही.
परिसरात कुणालाही या खरेदी केंद्राबाबत माहिती नाही. विशेष म्हणजे कोणतेही कार्यालय, कर्मचारी, गोडाऊन नसलेल्या खेरेदी केद्रला देण्यात आलेली परवानगीच आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.याच खरेदी केंद्राने दोन वर्ष रामनगर इथे हजारो क्विंटल सोयाबीन खरेदी केल्याची नोंद आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांनी या केंद्रावर सोयाबीन ची विक्री केलेली नाही. त्यामुळे अस्तित्वात नसलेल्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री कशी करावी असा यक्षप्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.
ज्यांच्याकडे सर्व सोयी सुविधा, कर्मचारी, गोडाऊन उपलब्ध आहेत. अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांना सरकार जाचक अटी लादून खरेदीपासून दूर ठेवत आहे. मात्र, सरकारने परवानगी दिलेल्या रामनगर येथील कुलस्वामीनी तुळजाई हे खरेदी केंद्रच इथे अस्तित्वात नाही. यामुळे आम्हाला नाहक त्रास होत असून शेतकरी आमच्याकडे येवून विचारपुस करत आहेत असं आयडियल या शेतकरी कंपनीचे संचालक भगवान डोंगरे यांनी लोकल18 शी बोलताना सांगितलं.